Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, २३ एप्रिल, २००९

कोवळी पहाट

Share

लक्ष ही नाही जात आता
झिटा पिशिंयम, अल्फा मायनोरिस
आणि
निरयनात अडकणा-या रेवतीचक्राकडे

ना वाटते भिती अर्बुदी मंगळी दशेची
मन आता नाही शोधत तो..उर्जस्वल योगी
नाही नाहीच रमत मी
असह्यतेच्या वर्तनात
बोथटतेच्या उद्वर्तनात
झुगारते.. संवेदनहीन मांसल अवगुंठन
स्विकारते फक्त चैतन्यमयी संवेदन..चिरंतन

हल्ली आकाशात दिसतो फक्त
गुलाबाचा रक्तिमा, नभाची लाली
आरक्त क्षितिजावरची कोवळी पहाट
लाजून चूर होऊन...
ढगाआड लपणारी..रात !

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top