Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, २६ एप्रिल, २००९

कवितेमध्ये जान असावी

Share

कवितेमध्ये जान असावी
पण शब्दांना वजन नसावे
हलके फ़ुलके येता जाता
सहजासहजी काव्य सुचावे

संध्याकाळि थकल्यानंतर
कवितेसंगत गप्पा व्हाव्या
गरम कॉफ़ीच्या घोटासोबत
छान छान चारोळी चखाव्या

वेळ असावी फ़ूलपाखरू
हळूच भुर्रकन यावी जावी
खांद्यावर हुळहुळ करताना
खुदकन एक कविता निसटावी

साथ मुलायम संग सुरमयी
गंध मंद अन रंग सावळा
शब्दामध्ये मौन गोजिरे
मौनामध्ये शब्द कोवळा

चिमुट चिमुट चव हर शब्दाची
चाखुन चोखून मस्त टिपावी
अर्थ असो वा ना शब्दांना
पण कवितेला जान असावी

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top