Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ एप्रिल, २०११

~~~प्रेम प्रेम प्रेम~~~

Share

प्रेम करणे सोपे आहे की कठीण आहे ???
हेच मला नाही कळले अजून
कोणी मला सांगेल का .....
प्रेम करणे सोपे आहे का कठीण ???

प्रेम करणे कठीण नाही
पण ते निभावाणे कठीण आहे ...का ???

प्रेमात गुन्तत जाणे सोपे आहे .....
पण ते आयुष्य भर टिकवणे सोपे आहे का... ???

प्रेमात विश्वास आहे माझा!!! हे बोलणे सोपे आहे
पण तोच विश्वास ठेऊन संसार करणे सोपे आहे का...???

हातात हात धरून चालणे कठीण नाही ....
पण हात धरून आयुष्य काढणे कठीण आहे का... ???

प्रेमात वचन देणे सोपे आहे
पण तेच वचन निभावणे सोपे आहे का...???

प्रेमात तास तास फोन वर बोलणे सोपे आहे.
पण फोन चे बिल भरणे सोपे आहे का.... ???

प्रेमात खोटे बोलणे सोपे आहे.
पण खोटे बोलून प्रेम टिकवणे सोपे आहे का ???

प्रेमात महागडे गिफ्ट देणे कठीण नाही
पण गिफ्ट साठी पैसा साठवणे कठीण आहे का ...???

प्रेमात मी तुझ्या बरोबर लग्न करेन बोलणे सोपे आहे.
पण लग्नाच्या वेळी घरच्या माणसांना पटवणे सोपे आहे का ???

प्रेम करणे सोपे आहे की कठीण आहे ???

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top