| आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे, क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ धृ ॥ किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग, पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग. कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे, क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ १ ॥ जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती, दिली दुर्दैवाला पाठ; अन् संकटाला छाती. सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे, क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ २ ॥ काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले, बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले. जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे, क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ३ ॥ कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती, जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती. येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे, क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ४ ॥ |
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
४:४७:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा