समाधान गणपत पाचपोळ
बुधवार, ९ जून, २०१०
हंबरून वासराले चाटते जवा गाय
समाधान गणपत पाचपोळ
१०:५७:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , वडील , Father , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , वडील , Father , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




2 टिप्पणी(ण्या):
या कवितेविषयी बराच घोळ घातला गेला आहे. याला कारण जितेंद्र जोशी नावाच्या कुणा
गायकाने या कवितेचे मूळ सांगतांना बर्याच थापा मारल्या आहेत. ही कविता मुळात नारायण
सुर्वे यांची नाहीच. ती हिंदीतून अनुवादीत झालेली कविताही नाही. मराठवाड्यातल्या
स.द.पाचपोळ(रा.हिंगोली) नावाच्या कवीचे हे गाणे आहे. डिसेंबर २००५ च्या धुळे येथील
विद्रोही साहित्य संमेलनात हे गाणे विद्रोही शाहीरी जलसा या कलापथकाने सादर केले. त्या
नंतर हे गाणे दक्षिण महाराष्ट्रात खुपच लोकप्रिय झाले. हे एक लोकप्रिय लोकगीत बनल्याने
याच्या कॉपीराईट इ. विषयी कोणी फारशी काळजी घेतली नाही. आता काही गायक हे गाणे
चोरून त्याच्या सिडीज बनवित आहेत पण दुर्दैवाने या गाण्याच्या मूळ निर्मात्यांना याचे श्रेय
देण्याचे बेमालून टाळले जात आहे. असल्या उठवळ व उचल्या लोकांपासून मराठी
ब्लॉगवाल्यांनी सावध रहायला हवे. नाहीतर मराठी साहित्याचा सारा इतिहासच खोटा लिहीला
जाईल.
अविनाश कदम, मुंबईसेंट्रल, मुंबई
मराठी साहित्यात वांग्मयचौर्य हा प्रकार तसा प्रचिनच. ही गाजलेली कविता आपण स्वतःच्या नावाने खपवित असताना केवळ ऐका कवितेची उचलगिरी करीत नाही तर जन्म देणार्या मायेची चोरी करीत आहोत, एवढीही लाज या चोर कवींना वाटत नाही. ही मुळ अस्सल कविता आही बुलडाना जिल्ह्यातील ऐका उपेक्षित कवीची. तो कवी म्हणजे "समाधान गणपत पाचपोळ ". एंशीच्या दशकात स. ग. पाचपोळ यांनी "माय" लिहिली. पाच वर्षापूर्वी त्यांच निधन झाल. औरंगाबादच्या पैठनी प्रकाशनाने "मराठी काव्य परिमल" या नावाचा नवोदित कवींचा प्रातिनिधिक कवितासंग्रह १९८७ ला प्रकाशित केला होता. या प्रातिनिधिक संग्रहात स. ग. पाचपोळ यांची "माय" सर्वप्रथम प्रसिद्ध झाली. त्यानंतर १९८९ मधे नांदेडच्या एस. डी. मडामे यांनी "माय" या नावाचा आईवरील कवितांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह स्वतः सम्पादित केला. या संग्रहात पान क्र. २१ वर स. ग. पाचपोळ यांची "माय" ही नऊ कळव्यांची संपूर्ण कविता आहे. (चोरांनो ही कविता स. ग. पाचपोळ यांचीच आहे , यासाठी आणखी काय पुरावा हवा.) बुलडाना जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील नीमगाँव या खेड्यात या दिवंगत कवीची पत्नी राहते. पतीच्या विखुरलेल्या कविता तिने जिवापाड जपून ठेवल्या आहेत. आपल्या प्रतिभावंत पतीची "माय" ऐकून कुणीतरी प्रकाशक समोर येईल आणि त्यांचा कवितांचा संग्रह प्रकाशित करेल, अशी भाबडी आशा ती बाळगुन आहे.
टिप्पणी पोस्ट करा