Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शनिवार, २८ नोव्हेंबर, २००९

♥ Valentine Day – ती आणी तो ♥

Share



एकदा एका गावात
एक आधंळा होता मुलगा
प्रेयसीच्या प्रेमामध्ये तो
रमला होता चांगलाच

मित्रांमध्ये तो कमी रमायचा
सर्वांचा तो राग करायचा
धिडकारुन सर्व जगाला मग
फ़क्त प्रेयसीलाच जवळ करायचा

तो नेहमी म्हनायचा तिला
जर दिसत असते डोळ्याने मला
तर लग्नाचा हा हार
घातला असता फ़क्त तुलाच

ती बिचारी लाजेनं चुर व्हायची
डोके ठेवुन त्याच्या छातीवर
देवाजवळ प्रार्थना करायची
आणी काळजी मग डोळ्याची करायची

मग एके दिवशी चमत्कार झाला
न बघनारा तो आता बघु लागला
कुनीतरी डोळे दान केल्या मुळे
स्वत:च्या डोळ्यातच स्वत:ला हरवु लागला.

पन जेव्हा त्याने तिला बघितले
त्याच्या मनातले विचार बदलले
कारण तिला सुद्धा द्रुष्टी नव्हती
त्याच्या सारखी ती सुद्धा लाचार होती

पन त्याला दिसु लागल्याची खुशी तिला होती
देवाचे ती उपकार मानत होती
त्याच्या सुख संसाराच्या स्वप्नात
कित्येकदा स्वत:लाच ती हरवत होती.

मग तिने त्याला विचारले
आता तु माझ्याशी लग्न करशील ?
तुझ्या हाताने माझ्या गळ्यात
लग्नाची ती माळ घालशील ?

पन आता त्याने लग्नाला नकार दिला
ह्रुदयाशी तिच्या मोठा घात केला
एवढे दिवस असलेल्या प्रेमाला
क्षनात त्याने पुर्णविराम दिला.

आता तिचे तर भानच हरवले
दुर जान्याचे तिने ठरवले
जाता जाता त्याला एवढेच म्हनाली
काळजी घे माझ्या ह्या दोन डोळ्यांची .....

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top