जाळल्यानंतर............ .उन्हाने वाफ व्हावा थेंब पाण्याचा, तसा झाला कसाही का असो अवतार माझाही बरा झाला हयातीला मजा आली, हयातीची मजा आली तिलाही फायदा झाला, मलाही फायदा झाला जिथे जाईन मी तेथे मला मी नेमका भेटे स्मशानी मात्र योगायोग थोडा वेगळा झाला अशीही माणसे होती, तशीही माणसे होती मला जो भेटला तो शेवटी माझ्यातला झाला तिलाही वाटले 'आता' मला वाटायचे जे जे चला; तो राहिलेला एकसुद्धा आपला झाला उधारी मागण्यासाठी हजारो माणसे आली कुणी फेडायला मागे नसे हा फायदा झाला तुपाची धार कोणी घातल्याने धूरसा झाला तिचेही नाव कोणी काढले अन जाळसा झाला कसे झाले, कसे झाले, जगाला केवढ्या शंका! कधीही पाहिला नाही असाही बोलता झाला 'कसा आहेस मुन्ना ? जाळल्यानंतर कसे आहे?' कुणी बोलायला होते कुठे? बस दाखला झाला..! |
रविवार, १ नोव्हेंबर, २००९
जाळल्यानंतर.............
११:०७:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा