| त्या दिवशी तुला शांत निजलेलं पाह्यलं तुझा वेदनारहित चेहरा इतकं शांत कधीच नसायचीस तू तुझ्याकडे बघत बसले होते मी वाटलं म्हणशील "नुसती बसू नको, उठ, काही काम कर!" खूप वाट पाह्यली तू म्हणशील म्हणून.. आत कुणीतरी चहा केला, कप वेगळे काढले "ह्यातले कप नकोत, गेल्यावर्षीचे नवीन आहेत त्यातले वापरा." असं काहीच तू म्हणाली नाहीस कोणी म्हणालं १५ वा अध्याय म्हणूया म्हणला! तुला रामरक्षा आवडायची ती पण म्हणालो आम्ही! अवघड उच्चार मुद्दाम चुकवले. "असं नाही गं सोने! त्याचा संधी असा असा होतो.. त्यामुळे उच्चार असा असायला हवा" असं नाही म्हणालीस तू! तू तशीच शांत निजून होतीस. तेव्हा कळलं.. नव्हे अंगावरच आलं.. बाळपणी कधीतरी धरलेलं तुझं बोट आज सुटलंय कायमचं |
रविवार, १ नोव्हेंबर, २००९
त्या दिवशी तुला शांत निजलेलं पाह्यलं
११:३४:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा