Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

बुधवार, १६ सप्टेंबर, २००९

तुझ्याविना...............

Share


जग माझे सुने सुने बघ! झाले तुझ्याविना

जीव रमवावा कसा मन कुठेही लागेना



दुःख, वेदनांचे घन बरसले माझ्यावर

आशा सागरी बुडाली, आला अश्रुनाही पुर

सख्या! जावू नको दूर मज पोहता येईना..............


क्षण क्षण आनंदाचा तुझ्याविना दुखी आहे

प्रेमजलाची सरिता दुःख सागरात वाहे

गंध नसताना तुझा आज वाराही वाहेना..........


तुझ्याविना जगी मला आज एकटेसे वाटे

दाहिदिशांचा कालोख माझ्या जीवनात दाटे

जगु कुणासाठी आता? तुझी साथ नसताना...................
लागे तुझीच चाहुल जिथे तिथे क्षणोक्षणी
साद घालता मी तुला भीने वारा पानोपानी
दिसे तुझीच प्रतिमा जिथे तिथे पाहताना .....................

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top