पंख बावरे लकलक करती
उडता उडता दिशा हरवती
एका जागी क्षणभर ठरती
लगेच उडती पुन्हा..
तयांचा छंद असे हा जुना.
फिरत रहाणे त्यांचे जीवन
मधुसंचय हे त्याचे कारण
अक्षय तृष्णा हेचि प्राक्तन
शांत कधी होईना..
तयांचा छंद असे हा जुना.
पंख जरी ते सुंदर असती
शरिरामाजी दिसे विसंगती
सत्य कधि ना समजुन घेती
करिती आत्मवंचना..
तयांचा छंद असे हा जुना.
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २००९
छंद
७:२५:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा