Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, २० ऑगस्ट, २००९

तो सहजच बोलला

Share

तो सहजच बोलला
"तू माझी मीरा..."
मी विचारल तर म्हणाला...
अग कृष्ण राधे जवळ राहत होता...
ती त्याच्या प्रेमात वेडी असण स्वाभाविक आहे...
पण मीरा मात्र खरी प्रेमदिवाणी...
तो तिला कधीच भेटला नाही...
तिच्या नशिबी कायमच विरह आणि वेदना...
तुही तशीच..
मी येतो...
फक्त काही क्षण तुला भेटतो...
ते ही तुला त्रासच होइल असा....
तू मात्र तितकाच प्रेम करत राहतेस...
कदाचित जास्तच...
मी फक्त हसले आणि म्हणाले...
"मीरेला तो कधीच भेटला नाही...
पण मला काही क्षण का होइना...
तुझा सहवास लाभतो...
हे खुप आहे रे मला श्वास घ्यायला...
तुझ्या पुढच्या भेटीसाठी मी जगते अस समज हव तर..."

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top