Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २००९

|| आज फोडायची दहीहंडी ||

Share

हे गीत पुणे आकाशवाणी केंद्रावरून ह्या पूर्वी प्रसिद्द झाले आहे.

जमवुनी सारे गोपगडी,
चला पिटवू दवंडी |
आज फोडायची दहीहंङी,
आज फोडायची दहीहंङी || ध्रु ||

घरी दह्या लोण्याचे रांजण,
दारी लाह्या पोह्याचे आंदण,
धन धान्न्याची ही उतरंडी,
आज फोडायची दहीहंङी || १ ||

फ़ळा फुलांनी सजली हंडी,
बाळगोपाळ उभे उदंडी,
प्रेमभावाची ही कुरवंडी,
आज फोडायची दहीहंङी || २ ||

उंच उंच रचू या मनोरे,
काय कठीण ? जाऊ सामोरे,
उडायची न घाबरगुंडी,
आज फोडायची दहीहंङी || ३ ||

पुनः पुन्हा मनोरा कोसळे,
गोपमेळा जमिनीवर लोळे,
नका हसू, उगाच लवंडी,
आज फोडायची दहीहंङी || ४ ||

हंडी फोडायचा एक चंग,
चिंब पावसांत भिजले अंग,
आज सोसायची थोडी थंडी,
आज फोडायची दहीहंङी || ५ ||

दहीहंङी मध्ये साठवण,
कष्ट करायची शिकवण,
फळ श्रमाचे मिळे त्रिखंङी,
आज फोडायची दहीहंङी || ६ ||

कान्हा क्षणात रिंगणी आला,
हंडी फोडुनी केला हो काला,
मुखी जाई प्रसादाची उंडी,
गोविंदानीच फोडली हंडी || ७ ||

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top