|| ॐ नमःशिवाय ||
हेमपुरिचे भाग्य उजळले,
उमा सदनी, शंकर आले || ध्रु ||
भाव भक्तिची तिला आवडी,
दंभपणाची तिला वावडी,
निज श्रद्धेचा भाव रोकडी,
गिरिजापति ओवाळले || १ ||
तपोवनिची भक्त अपर्णा,
शिवानंद होता अवतीर्णा,
बिल्वदलाला, करी अर्पणा,
विश्ववंद्या श्वास वाहिले || २ ||
व्रतस्थ होई, उपास धरुनी,
संध्या समयी, स्नान करुनी,
शिवा पुजिले, मनापासुनी,
ॐकारात मन रमले || ३ ||
वसा आचरता, सोमवार सोळा,
धाऊनी आला, स्वयंभू भोळा,
सवे तयाच्या, शिवगण गोळा,
आसमंत तेजाळले || ४ ||
धार दुधाची, पिंडीवरती,
मुखी शिवाची स्तुति-आरती,
भक्तासाठी, शिव पार्वती,
प्रचिती देण्या अवतरले || ५ ||
होई नाहीसा, कोप शिवाचा,
महिमा पावे, शांती-सुखाचा,
आशिष मिळता गोसाव्याचा,
भाग्य कमल उमलले || ६ ||
शिवभक्तिचा अगाध महिमा,
जळती पापे, नुरे काळिमा,
पुण्यराशीला, नुरती सीमा,
विश्वंभराने गृहा व्यापले || ७ ||
पूर्ण जाहले, आज मनोरथ,
सांब सदाशिव दावी सत्पथ,
म्हणुनी लाभला, हा ऐरावत,
जिणे धन्य धन्य झाले || ८ ||
देवी गिरिजा, शंभो शंकर,
महिम्न देवा, तू ही शुभंकर,
आशिष देता, झुकले अंबर,
जीवन ज्योतिर्मय झाले || ९ ||
रविवार, २ ऑगस्ट, २००९
|| ॐ नमःशिवाय ||
५:४८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा