आला आला पावसाळा
ही रचना पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसिद्द झाली आहे.
दूर गेल्या ग्रीष्म झळा | पळाला उन्हाळा |
स्रुष्टीला या सजवाया | आला पावसाळा || १ ||
पावसात खेळायला | चला सारे जाऊ |
भिजताना पावसाची | गाणीपण गाऊ ||२||
नका कुणी उघडू रे | काळी कुट्ट छत्री |
पावसाशी सारे जण | करू घट्ट मैत्री ||३||
वेगे वेगे अंगावरी | झेलू जलधारा |
भरे जरी हुडहुडी | तरी वेचू गारा ||४||
"थेंबे थेंबे साचे तळे" | शिकू अशा म्हणी |
मनामध्ये साठवता | विसरे ना कुणी ||५||
खळाळत्या ओहोळात | सोडू खूप होड्या |
कुरबुरी करू नका | केल्या कुणी खोड्या ||६||
माशासम पाण्यामध्ये | पोहू या कां सारे?
किंवा मोर होऊनिया | फुलवू पिसारे ||७||
तळ्यावरी भिरकावू | थोड्या ठिक-या |
आईपेक्षा मोठ्या थापू | सा-या भक-या ||८||
तां ना पि हि नि पां जां | इंद्रधनू रंग |
भान हरपुनी पाहू | सात रंग संग ||९||
धरित्रिच्या अंगावरी | बरसता थेंब |
पहा झणी फुटताती | हिरवेसे कोंब ||१०||
थांबू थोड़े, राहू उभे | पाघोळ्याच्या खाली |
मोतीयाचे थेंब सजे | प्रत्येकाच्या गाली ||११||
गारठुनी अंगावरी | येताच शहारे,
कानावर तेंव्हा पड़े | आईच्या हाका रे ||१२||
सटासट, लगोलग | नका कुणी शिंकू |
गारा वेचण्याची स्पर्धा | कोण शके जिंकू? ||१३||
मुक्तपणे चरताती | गुरे कुरणांत |
घुंगरांच्या माळा गळा | घुणघुणतात ||१४||
झाडांच्या त्या फांद्यावरी | जमतील पक्षी |
खेळ मौजेचा आपुला | तेथुनी निरीक्षी ||१५||
रोज उगायचा वसा | सूर्य विसरला |
किरणांचा गालिच्छा कां | अन्य पसरला? ||१६||
सोसाट्याचा वारा नेई | पावसाला दूर |
चिंब भिजू तोवरीच | खेळू भरपूर ||१७||
आला आला म्हणतांना | गेला रे पाऊस |
कल्पनेच्या विश्वामध्ये | फिटली रे हौस ||१८||
रविवार, २ ऑगस्ट, २००९
आला आला पावसाळा
५:३७:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem , rain
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem , rain
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा