Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

प्रणय गीत

Share

बाहुत गुंतले बाहू अन श्व्सात गुंतले श्वास
उंच झुल्यावर नेल्स सख्या असे होतसे मजला भास

ही रात्र बेधुंद सख्या अन मी अशी तुझ्या मिठीत रे
सहवास तुझे गरम की गातोस तू प्रणयाचे गीत रे
आवेगाने चुम्बता मजला सोडिशी हे वस्त्रांचे पाश
उंच झुल्यावर नेल्स सख्या असे होतसे मजला भास

केसात गुंतला हात तुझा अन वक्षात गुंतले ओठ
स्पर्शाचे तुझ्या उठती अंतरी प्रेम तरंगाचे लोट
प्रेम कुबेर तू सख्या ओतिशी मजवर चुम्बनाची ही रास
उंच झुल्यावर नेल्स सख्या असे होतसे मजला भास

नको नको की पुरे आता रे पुरे हा धुसमुसलापना
चुम्बिले तू अंग प्रत्यंग बस बस हा चावटपना
कर जे हवे हवे तुला ते, संपू दे मिलनाची ही आस
उंच झुल्यावर नेल्स सख्या असे होतसे मजला भास

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top