Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शनिवार, ६ जून, २००९

तू नसशील...!

Share

Fire on ice...!!!

अंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्द
पाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाही
तुला कसेसे होई
पहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजताना
तुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटत
दूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्या
छातीतले इमानी दु:ख भरभरुन वाहू लागे.


एकदा सोनेरी संधीप्रकाशात झळ्झळती केतकी
साडी नेसून गच्चीवर मी तुझ्यासमोर आले
तेव्हा एकटक न्याहाळत कवितेतल्यासारख तू
म्हणाल होतास,
"आता मी कोणता संधीप्रकाश पहायचा ? "
हे सारे उद्याही तसेच असेल.......
ऋतुचक्राचे आस आपल्या गतीने फिरत राहतील
संधीप्रकाशाचा सोनेरी लावण्यात अवघा आसमंत
न्हाउन निघेल.

आणि पहिल्या पावसाच्या बेभान वृष्टीत धरतीचा
कण न् कण पुळकीत होउन नाचू लागेल
हे सारे तसेच असेल
फक्त तू नसशील.........तू नसशील
मात्र गुलमोहोराच्या ओसडंत्या पाकळ्यांतून वेदनेची
लालजर्द आसवं तुझ्या आठवणीसाठी वाहतच राहतील.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top