नेहमी तिचाच विचार, नेहमी तिचीच आठवण
का एका मैत्रिणी साठी मी इतके झुरतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
चार चौघात मित्र मला तिच्या नावाने चिडवतो ...
का त्याचा प्रयत्न फसतो कारण खरतर मनात मी हसतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
'परदेशी चाललास पण मला विसरु नको'
का तो तिचा शेवटचा SMS मी परत परत वाचतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
तू परत कधी येणार? ती रोज रोज विचारते :(
का 'नक्की नाही' म्हणताना माझा आवाज खालावतो...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
तिला एक स्थळ आले, कोणी तिला पाहून गेला
का तिने त्याचे नाव घेता मी विषय बदलतो
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
हे प्रेम नाही मैत्रीच आहे, एकच उत्तर नेहमी
पण का ते खरे की खोटे असा प्रश्न मला पडतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
शनिवार, ६ जून, २००९
नेहमी तिचाच विचार, नेहमी तिचीच आठवण
११:५७:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा