Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

अश्रूंना ही एक अस्तित्त्व असते ना..

Share

पुन्हा येशील तू आंब्याच्या झाडाखाली..
बुंध्याला टेकून बसशील
माझ्या आवडीची
मोरपंखी साडी नेसली असशील...
मी म्हणेन मनात
अजूनही छान दिसतेस.

रखरखीत उन्हात
आंबा तुझ्यावर गार गार छत्री धरेल..
तू असशील हरवलेली..विस्कटलेली
मी आणलेली पर्स.. मनालीहून,
तुझ्या हृदयाशी घट्ट धरलेली असेल
हळूच तू ती पर्स उघडशील..
त्यात असतील काही पत्रे..
ओलेत्या शब्दांनी लिहिलेली
काही फोटो...तुला मला धरून ठेवणारे
काही आठवणींची शिल्पे..
कायमची हृदयावर कोरले्ली
आखूडशिंगी पाऊस अचानक सुरू झालेला असेल


कुठूनसे अचानक वारे वाहतील
तुझ्या हातातील कागद उडून जातील
तुला धरायचे असतील ते सारे..
पण
पायात त्राण नसेल तुझ्या..
व्हीलचेअरकडे पाहतांना तुझे
डोळे भरून येतील
टपो-या शिडकाव्याचे अरबीअश्वाच्या
शुभ्र झुपकेदार शेपटासारख्या
मुसळधार पावसात रूपांतर झालेले असेल..

तुझे अश्रू त्यात मिसळून जातील..
पाऊस पाहून हरखणारा मी..
निखळलेले मोती वेचायचा प्रयत्न करीत असेन..

मलाही तेव्हां मग
अश्रू ढाळायचे असतील..

पण....पण..
अश्रूंना ही एक अस्तित्त्व असते ना..
आणि

अश्रू ढाळायला ही हवे असते ना....!!

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top