आईच्या कुशीत
मला आता लपछपी खेळायचं आहे
आई म्हणते एक मिनिट,
काढते मी सिनेमाचे तिकीट !
मला आता बाहेर जायचं आहे,
बाबा करतात बगिच्यात काम
म्हणतात होईल बाऊ आतच थांब !
मला हवे आहे चॉकलेट,
ताई करते पुढे कटलेट
मला गाणे ऐकायचे आहे
आजी म्हणते आधी बाप्पा जय जय करायचं आहे !
मग माझी सुरु होते स्वयंपाकघरात खुडबुड,
सगळे म्हणतात पुरे तुझी लुडबुड !!
होणार तरी मी केव्हा मोठी?
बंद होतील मग सगळ्यांच्या कटकटी.
मला आली आहे गाई गाई,
आईच्या कुशीत मी गुडूप होई.
मोठे झाले की पण कुशीत झोपता येईल की नाही?
म्हणूनच मला मोठं होण्याची नाही बरं का घाई!!!
मला आता लपछपी खेळायचं आहे
आई म्हणते एक मिनिट,
काढते मी सिनेमाचे तिकीट !
मला आता बाहेर जायचं आहे,
बाबा करतात बगिच्यात काम
म्हणतात होईल बाऊ आतच थांब !
मला हवे आहे चॉकलेट,
ताई करते पुढे कटलेट
मला गाणे ऐकायचे आहे
आजी म्हणते आधी बाप्पा जय जय करायचं आहे !
मग माझी सुरु होते स्वयंपाकघरात खुडबुड,
सगळे म्हणतात पुरे तुझी लुडबुड !!
होणार तरी मी केव्हा मोठी?
बंद होतील मग सगळ्यांच्या कटकटी.
मला आली आहे गाई गाई,
आईच्या कुशीत मी गुडूप होई.
मोठे झाले की पण कुशीत झोपता येईल की नाही?
म्हणूनच मला मोठं होण्याची नाही बरं का घाई!!!




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा