Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

मंगळवार, ५ मे, २००९

खरच आई .......

Share


खरच आई .......
खरच का ग आई
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर
पुढचा जन्म मागतात का?

प्रत्येक सातव्या जन्मी मी
सात जन्म मागणार आहे ,
तुमच्याच पोटी येण्यासाठी मी
एक तरी तप करणार आहे.........

प्रत्येक पुढचा जन्म माझी
तूच आई व्हाविस ,
अणि जन्म घेण्याआधीच मला
त्याची माहिती असावी.........

तुझ बोट धरून मी
इवली पवल चालेन,
इवली इवली पावल म्हणत
प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर चालेन.....

ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात
पाणी मी बघितल आहे,
पण तुला हसवान्या साठी मला
परत जन्मा घ्यायचा आहे........

देता असता आला तर
माझ उरलेला आयुष्य दोघाना देइन,
अणि पुढचा जन्म घेई पर्यंत
तुमच्या मनामधे रहिन....

खरच आई .......

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top