Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

दुःख हे

Share

दुःख हे

एकटे माझ्यासवे चालणारे दुःख हे
लाख मी दमलो जरी, धावणारे दुःख हे

पायही थकले पुरे, का श्वास आत कोंडला ?
मॄत्युही रेंगाळतो अन हासणारे दुःख हे

तारकांचा भास नुसता, सुर्य गगनी तळपतो
मग नभाला ग्रहण होऊन, व्यापणारे दुःख हे

अंतही आला असा की जाळणारे ना कुणी
मग स्वतः बनुनी मशाली, जाळणारे दुःख हे

लाल आहे रक्त तरीही, पांढऱ्या पेशी कश्या ?
ताप होऊनी तनावर, बोचणारे दुःख हे

केसही गळतोच आहे, रंग मी भरतोच आहे
वॄद्ध या देहास तरीही, भोगणारे दुःख हे

जन्म, मॄत्यु आणि अश्रु देवही ना वगळला
नियम धाब्यावर उचलुनी, टांगणारे दुःख हे

गालगागा गालगा, "संतोष" हे ना जाणतो
उमटते जे आतुनी, ते मांडणारे दुःख हे

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top