वाकलेले अश्रु माझे
सांभाळले होतेच ना
तु जाताच प्रसवल्या
आठवांच्या तिव्र वेणा...
पांगलेले शब्द माझे
आज गोळा जाहले
वेदना संवेदनांचे
अर्थ मजला लागले...
आकाश माझ्या पायतळी अन्
सुर्य होता झाकला
उजाडले आता असे की
दिशांत जाळ फेकला...
कातडी वज्रासारखी
मनही पत्थरासारखे
अभिषेक झाला असा की
सारे विरघळले...ओघळले!
यातनांना करुनी पार
गेलीस तु, तुटली तार
आर्त झाले माझे गाणे
पिसाळला स्वर नाद....
माय तूच, तूच जनक माझी
तूच होता राम, तूच माझी जानकी
तूच गुरु, माझी सखी
आई......मी आता पोरकी.
कुणी नसेल आता
पहात वाट उंबरठ्यावरी
ना उतरवेल कुणी तुकडा
म्हणेल, 'आला माझा बछडा'....
पाठीवरुनी हात नाही
की तसा मऊ भात नाही
ना रागावशील अधिकाराने
ना घेशील जवळी ऊबेने....
त्या ऊबेला, त्या सुखाला
झाले आता मी पारखी
गुंतले शोकांत आई,
आठवण येते गं सारखी!
तुझे शिकवणे तुझे सांगणे
आहे सारे हृदयात जागे
लढेन वादळांशी धिराने
ना पाहीन वळुनी मागे.
पण....
कोणास मारु हाक 'आई'
'काय रे बाळा...' उत्तर नाही.
मऊ स्पर्श तुझा झुळुकेतुन...
आई...आई...गं आई....................
मंगळवार, ५ मे, २००९
गं आई.........
११:१०:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: आई , कविता , मराठी कविता , Aai , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: आई , कविता , मराठी कविता , Aai , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा