Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

अभंग

Share

अंतरीचे क्लेष अंतरी जपावे
उणे अधिक कटू बोलू नये ||

कामभावना र्‍हासाचे मूळ
विस्तवाशी संग करू नये ||

हरेक ह्रुदयी लपला हरी
मंदिराच्या पायर्‍या झीजवु नये ||

दिनांच्या डोळी आनंद चेतवावा
फुका कुणा दुखवू नये ||

संपत्तीची हाव दुखास कारक
वैभवाचा संचय वाढवू नये

अंतरीची भाषा उमगून घ्यावी
व्यर्थ चिंते मना कष्टवु नये ||

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top