अस्सा पाउस …. तस्सा पाउस
कोसळणारा टपटपणारा
भिरभिरणारा भुरभुरणारा
हुरहुरणारा झरझरणारा
आला पाउस .. गेला पाउस
.. .. अस्सा पाउस … तस्सा पाउस !
शेतावरती टपटपणारा
गालावरती कोसळणारा
मनास संगे नाचवणारा
आला पाउस .. गेला पाउस
.. .. अस्सा पाउस .. तस्सा पाउस !
स्वप्नामधे भिरभिरणारा
भासामधे भुरभुरणारा…
होत सावळा पाझरणारा
आला पाउस .. गेला पाउस
.. .. अस्सा पाउस .. तस्सा पाउस !
होत बावरा हुरहुरणारा
साजण गाणी झरझरणारा
ओल्या माती रिमझीमणारा
आला पाउस .. गेला पाउस
.. .. अस्सा पाउस .. तस्सा पाउस !
शुक्रवार, २२ मे, २००९
अस्सा पाउस …. तस्सा पाउस
१२:३०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा