Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, २४ मे, २००९

पाऊस.. असा यावा...

Share





पाऊस.. असा यावा...
जसे पैन्जण वाजवत
कुणीतरी यावे..


पाऊस.. आला की मला माझी वही आठवते..




पावसाच्या कवितान्निच माझी

वहीचिम्ब भिजलीय

वाहणारे डोळे आता कोरडे होताहेत...

आपोआप

कोणी सान्गावे तो येईल....

अवचित ध्यानीमनी नसताना
दबक्या पावलान्नी

अन

बरसत सुटेल बेभान....

मग पुन्हा कोरडीठाक होईल

माझी वही...पहिल्यासारखी..

नवी कोरी.....

तिच्या पानान्चा वास मात्र

असेल पावसासारखा...

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top