Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

भ्याड सैतान

Share

कधी मशीदित कधी देऊळात
तुला शोधतात जळात स्थळात
हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाइ
जाती धर्मात तुला वाटतात

कुणी म्हणती ईश प्रभुला
कुणी येशू अन कुणी अल्ला
हिंस्त्र पशू का बनले सारे
श्वापदांसम करीती हल्ला

प्रेम, शांती अन बंधुभाव
केव्हाच झाला हद्दपार
हद्दिवरती नित्य चालती
भुईसाठी लढाया अपार

तुझ्या पताका घेऊनी हाती
मुला-बायांच्या रक्ती न्हाती
डोई फोडून माना चिरती
निरपराध्यांची हत्या करती

पाचोळ्यापरी मुडदे पडती
कोणी आक्रंदती दुजे हसती
अशी कशी रे रीत तुझी ही?
मानवापोटी सैतान निपजती

भ्याड जेत्यांच्या पराक्रमाची
विकृत रीत ही केलीस
नयन झाकले असशिल देवा
की तूच सैतानाच्या ओलीस?

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top