आभास चांदण्यांचा
स्पर्शात रात्र गेली
सजणी मिठीमधोनी
गात्रांत होत गेली
केव्हां तरी उगवली क्षितिजी निळी पहाट
माझ्या निळ्या नभाशी सजणी नहात गेली
कैसे स्मरु कितीदा ओठांस स्पर्श झाला ?
रात्री तिच्या सुरांची बरसात होत गेली
केला असा बहाणा का रात्रीस मोगऱ्याने ?
मी ताल होत गेलो अन ती सुर होत गेली
माझ्या मिठीत तिही ठेऊन स्पर्श जाता
शेजेवरुन कितीदा थांबत पहाट गेली




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा