का पाऊस”….
पाऊस पाऊस
पावसाचं नेहमी असच असतं
तुला भेटायचं असतं
तेव्हाच त्याला पडायचं असतं…
चालता चालता
वा~याचं असं भेभान होणं
छत्री उडवून माझी
पावसाला मला भिजवण्याची संधी देणं…
काळ्या काळ्या
ढगाचं गडगडुन माझ्यावर हसणं
बघता रागाने ढगांकडे
विजेचं माझ्यावर कडाडुन चमचमणं…
चिम्ब चिम्ब
होऊन तुला भेटायला येणं
हॉटेलमधे बसल्यावर
तुझं मला ते रुमाल देणं…
गरम गरम
कॉफ़ी एकाच कपमधे पिणं
“पाऊस थांबला कि जा”म्हणून
तुझं मला थांबवून घेणं…
गुपचुप गुपचुप
पावसाला “थॅन्क यू” म्हणनं
तुझा सहवास लाभेल म्हणून
पावसाला “पडत राहा” अशी विनावणी करणं…
नावडता नावडता
म्हणत होते मी पावसाला
सा~या गोड आठवणी आठवता
पाऊस झाला आज “लाडका”…
शुक्रवार, २२ मे, २००९
का पाऊस”….
१२:३३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा