Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २२ मे, २००९

पाउस हा खूळयागत असा का ग वागतो.?

Share

पाउस हा खूळयागत असा का ग वागतो.?
मला भेटण्याआधी तुलाच का तो भेटतो.?

कधी तुझ्या स्वप्नी, कधी लेखणिने बरसतो
तरी तुझ्यासाठी तो उगाच का ग तरसतो.?

धाडीतो निमंत्रण तयास मीही यायची
पण मलाच पाहुनि तो कुत्सित का हासतो.?

तुला पाहुनि कसा तो सर सर सर कोसळतो
मला मात्र नेहमी तो अबोल का ग वाटतो.?

तुझ्या अंगणी जणू तो मोती होऊन सांडतो
माझ्या अंगणात वेडा चिखल होऊन साचतो.!

अशी काय मोहिनी तू टाकलिस त्यावरी
अनोळखीच दृष्टीने तो मला न्याहाळतो.!

त्यास ओढ मायेची जी तुझ्यात गवसते
म्हणूनि तो अधीर् होत येउनि तुज बिलगतो.!!

पाउस हा खूळयागत असा का ग वागतो ?
मला भेटण्याआधी तुलाच का तो भेटतो.???

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top