अनेक संकल्प केले होते
मन होते भारावलेले.....
पण हातातून उडून जाताना
त्यांनी अनेक रंग मागे ठेवले
फुलपाखरा सारखं स्वच्छंदी आयुष्य
कधी जगता येत का?
सगळ्यांसोबत चालताना
एकट्यासाठी कधी जगता येतं का?
अळवावरचा एक थेंब
म्हणजे आपलं जगणं असतं
पानाचा आधार असला तरी
पानाचं आणि थेंबाच
कधिच पटत नसतं
आयुष्यात मागे वळून बघतांना
मन होतं हळ्वं
आठवतात मग या पायान्नी
कधीच न स्पर्शिलेलि गावं
आपण काही ठरवण्याआधी
नियतीनेच ठरवलेलं असतं सगळंकाही
आपण फक्त म्हणायचं असतं
ठरवलं होतं खूप काही...
गुरुवार, ७ मे, २००९
ठरवलं होतं खूप काही
११:४६:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा