Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २२ मे, २००९

चिंब चातक

Share

रखरखीत ऊन
पेटलेलं आभालं
तापलेली जमीन
व्यापलेली तहान
व्याकूळ डोळे
रेटणारं पाऊल
अवघड वाट
मनातलं काहूर
शेवटी आभाळालाही भरुन आलं
मुक्तपणे बरसलं
माझं मन जणू काही त्याच्यासाठीच तरसलं
गैरसमजच हा त्याचा
म्हणूनच कोसळला पाऊस
चातक समजला मला
आणि पुरवली माझी हौस
पण चिंब होउनही
तुझ्याविना मी व्याकूळच
एक चिंब चातक!

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top