Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

मंगळवार, ५ मे, २००९

आई,

Share

किती लहान होतो आम्ही

वडिलांचा आधार निखळला

हसत्या खेळत्या परिवारावर

दु:खाचा डोंगर कोसळला



तेव्हां पासून तू आमच्यासाठी

दोन-दोन भुमिका निभावतेस

वडिलांची कमतरता जाणवते

पण तू किती मायेने संभाळतेस



वडीलांची धाक काळाने हिरावली

तरी नाही आम्हा वाया जाऊ दिलंस

स्व:ताची झीज करून तू

आमचं भविष्य उज्वलं होऊ दिलसं



आई, पुष्कळदा वाटतं तुझ्यावर

नुसतं भरभरून लिहीत रहावं

येणाऱ्या पिढयांनी मग तेव्हां

तुझ्या महानतेचा आभाळ पहावं

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top