मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
कुणीही पितांना दिसला
कि आशेनें पाहणारा..........
*******************************************
घरा भोवति कुंपन नको
म्हणजे नीट आत जाता येते
बायकोनं नाहि उघडलं दार
तर पायरीवरच झोपता येते
*******************************************
पाजणारं कोणी असेल तर
प्यायला तरुन तुर्य्क आहोत
स्वतःच्या पौशांनी प्यायला
आम्ही काय मूर्ख आहोत?
*******************************************
नेहमीच काव्याने नशा करु नये
कधी मद्दालाही वाव द्यावा,
तहानलेल्या रसिकांना
थोडी पाजुन भाव द्यावा
*******************************************
दारुडे बेहोश होउन कोसळतात
तेव्हा किंकाळी फोडत नाहित
याचा अर्थ असा नाहि की
त्यांची हाडे मोडत नाहीत
*******************************************
प्रत्येक तळीराम पितांना सांगतो
मी 'चषक' सोडणार आहे
चषक म्हणतो, तुझा संकल्प
मीच उद्या मोडणार आहे
*******************************************
मंगळवार, ५ मे, २००९
चारोळी,
११:०१:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , चारोळी , मराठी कविता , मराठी चारोळी , मराठी चारोळ्या , विनोद , charoli , marathi charolya , Marathi Kavita , Marathi poem

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा