'ती’ आणि ‘पाउस’..
पाउस…किती आनंद होतो ना पाउस चालू झालाकी…पण आतशा हाच पाउस, तिची आठवन करुन देतो,
तिचे विचर मनात घोळका करतात, मनात काही प्रश्न उठतात..काही ईच्छा येतात..आणि मग, तिचि आठवण,मनातले प्रश्न आणि मनातली इच्छा यांतून येते हि कविता…’ती’ आणि ‘पाउस’ ….
‘ती’ आणि ‘पाउस’..
मला पहाचय तिला एकदा पावसात भिजताना,
सर-सरनार्या सरींमध्धे ओली-चींब होताना…
पहिल्या वहिल्या पावसात,
ती नाच नाच नाचेल
चेहेर्यावरचं हस्य तिच्या,
आणखि खुलुन उठेल..
पाउस सुध्धा वेडा होईल,
तिला ओली करताना..
मला पहाचय तिला एकदा,
पावसात भिजताना…
भिजता भिजता हळूच,
ती केसं मोकळे सोडेल..
डोळ्यावरची ओली बट,
हळूच मागे सारेल..
उर्वशीही लाजवेल बिचारी,
तिचं मोहक रुप बघताना,
मला पहाचय तिला एकदा,
पावसात भिजताना…
भिजता भिजता कदाचीत,
ती माझी आठवन काढेल..
बरसनार्या त्या पावसालाही,
मग माझाच हेवा वाटेल..
पण,ख्ररच माला आठवेल का ती?
अस काही घडताना..
मला पहाचय तिला एकदा,
पावसात भिजताना…
पावसाळा चालू झाला की,
तिचेच विचार मनात येतात..
नकळतच डोळे माझे,
उगाचच पाणावतात..
पण,माझ्या भावना कळतात का तिला?
मी तिच्या आठवनीत भिजताना..
मला पहाचय तिला एकदा,
पावसात भिजताना…
कधीतरी पावसात ती,
माझ्या सोबत असेल..
मी तिच्या प्रेमात आणि,
ती पावसात भिजेल..
पुर्ण होईल का माझ स्वप्न?
मी या जगात असताना..
मला पहाचय तिला एकदा पावसात भिजताना,
सर-सरनार्या सरींमध्धे ओली-चींब होताना…
शुक्रवार, २२ मे, २००९
‘ती’ आणि ‘पाउस’..
१२:२८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा