Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

मंगळवार, ५ मे, २००९

वडील

Share

आई व वडील हे आपल्या भावविश्वातील,
आयुष्यातील श्रद्धास्थान .
आईवर खूप लिखाण आहे.मात्र वडीलांवर फारसं लिखाण वाचनात नाही.
या कम्युनिटीत आपण वडीलांची थोरवी ,जशी आपल्याला जाणवली ती शब्दात मांडण्याचा प्रयत्न करू या.

वडील

त्यांच्या खांद्यावर बसून
जग दिसतं ते आपल्याला नवं नवंच
आयुष्यभर घरासाठी
वडील होऊन राहतात कवच

सावरण्यासाठीच असतात
त्यांचे मजबूत हात
असतात वडील तोवर
जाणवत नाहीत आघात

ऊन वारा पाऊस झेलत
वडील लकाकी हरवून जातात
उडून जातात पाखरं तेव्हा
वडील एकाकी होऊन जातात

दाटून येतो कंठ गळ्यात
पण अश्रू पापणीतून गळत नाही
आपण वडील झाल्याशिवाय
मोठेपण त्यांचं कळत नाही

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top