तू येशील ना
अजूनही मी तुझी वाट पहाते,तू येशील ना
त्या रम्य स्वप्नात पुन्हा मला नेशील ना…………….
प्रित ही आहे तुझी आणि माझी
जाई जुई च्या फुला सारखी नज़ूक
आपल्या प्रीतीचे गाणे आणि गोडवा
हृदयाच्या कोपर्यात मी ठेवलाय जपून
ते मोहावणारे सूर छेडण्या साठी परत
तू येशील ना….
आठवणीत आहेत अजुन तुझे बोलके डोळे
काहीही ना सांगता खूप काही सांगणारे
मन्त्रमुग्ध होऊन मला पाहणारे
मनातल्या मनात मला लाजवणारे
आणि एका क्षणात मला हसवणारे
त्या नज़रेत पुन्हा मला सामावून घेण्यास
तू येशील ना…….
प्रेमाच्या वेलिवर अजूनही फुले आहेत उमललेली
दवबिंदू सहित पाकली ना पाकली खुललेली
समीरा संगे अजूनही त्याचा सुगंध पसरतो
ओल्या चिंब भावना,त्यात सतत दरवळतो
आपल्या प्रेमाचे हे गुपित,सगळ्यांना सांगण्या साठी
तू येशील न….वाट पहाते मी अजुन तुझी…….
रविवार, १९ एप्रिल, २००९
तू येशील ना
१२:३६:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा