Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

बुधवार, २९ एप्रिल, २००९

काय म्हणू मी?

Share

काय म्हणू मी?``
या ओढीला काय म्हणू मी?
प्रीतीची सुरवात म्हणू?
हृदय सागरावर उठलेला
भीषण झंझावात म्हणू?

या वेडाला काय म्हणू मी?
आशेचे नवगान म्हणू?
की मृगजळ ते पाहूनिया
मृग हरवले भान म्हणू?

हे आवडणे हे आठवणे
प्रेमाचा मधूमास म्हणू?
की एकटेपण संपवण्याचा
एक अट्टाहास म्हणू?

या प्रेमाला.... काय म्हणू मी??

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top