Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, १९ एप्रिल, २००९

मोबाइल प्रेमी

Share

मोबाइल प्रेमी
ती मला मिस कॉल देणार
मी तिला कॉल करणार
तिची आई विचारणार
ती फोन कट करणार

सकाळी फोन चा अलारम वाजनार
मी तिला गुड मॉर्निंग चा sms करणार
तीच बा फोन वाचणार
आणि मला रिप्लाइ करणार

रवि वार मोबाइल तू मोबाइल स्कीम असणार
मी भल्या पहाटे 11 वाजता तिला कॉल करणार
पण है रे सॅम पित्रोदा
नेटवर्क डाउन असणार

(आधी भेटलेली नसल्याने) तिला भेटायला बोलावनार
मुंबई बाहेर भेटायची जागा ठरवणार
तास तास वाट बघत तिला कॉल चा ट्राइ मरणार
coin box वरुन तिचा कॉल येतो की रोमिंग नाही चालणार

वॅलिंटाइन डे ला परत सकाळी उठनार
फोनवरून तिसरा की चौथा प्रपोज़ तिलाच मारणार
पण हाय रे नशिबा माझ्या
त्या गद्दार निचा फोन दिवसभर एंगेज असणार

एक दिवस निर्णय घेणार
तिलाच करणार
थरतरत्या हाताने नंबर फिरवनार
आणि देवा रे,तिचा नंबर चेंज होणार

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top