Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, १९ एप्रिल, २००९

एक कळी

Share

एक कळी
एक कळी उमलायची राहिली
गालावरची खळी तशीच राहिली
तीने ऐकले उमलले की
पाकळ्या पाकळ्या होतात
हे अर्ध आयुष्य पण
कस काय जगतात
ह्या विचारात ती राहिली

वार्याने हसवून बघितले
दवाने भिजवून टाकिले
तरी ती काही उमलेना
भुग्याने कानात सांगितले
हा नियमच आहे निसर्गाचा
निसर्गात स्वताला रंगवन्याचा

कळीचे फुल झाले सुगध
चारही दिशा दरवलू लागला
येउन फुलपाखरू मकरंद चोरु लागला
काही क्षण सहवासाचे
तो देऊन गेला
शेवटी परकाच ना आपला
या आकाशी उडू लागला .....

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top