* सोन्याचा गोळा **
अहाहा ! कित्ती उबदार आहे हा सोन्याचा गोळा
गोल गोल गरगरीत
पिवळा धम्मक
ह्याला
घरी नेऊन छतालाच टांगून ठेवते..
जास्त गरम झाला की
विझून टाकेन
जास्त थंड झाला की
जवळ घेईन..
बरं झालं
आज सकाळी लवकर उठले
नदीकिनारी फिरायला आले
तर हा अस्सा हळूच
नदीकिनारहून वरती चाललेला..
हम्मम्म,
आता
ह्याला अलगद खाली घेते
अन कुणी बघायच्या आत
घरी पळवून नेते..
बुधवार, २९ एप्रिल, २००९
* सोन्याचा गोळा **
२:२०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा