Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

बुधवार, २९ एप्रिल, २००९

रेशिम

Share

मोठ्या अभिमानाने मी म्हटल
नक्कि जमेल मला तुझ्याशिवय रहायला
एवढ काय त्यात
पण एक रेशिम रुतुन राहील
तुझ्या नि माझ्या नात्यात
सतत खुपत राहील
रुतून बसल मनात

निघता निघत नाही
सुटता सुटत नाही
तट्कन तोडून टाकण
माझ्या स्वभावातच नाही

पुढे तर जायचय मला
थाम्बून चालणार नाही
जगाची ही धोपट वाट
माझ्याच्यानी चुकणार नाही

तेव्हा आता

या रेशमाबरोबर
मझी थोडी स्पन्दने ठेवते
सतत धडकत ठेव त्याना
एव्हडीच आज मागणी करते

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top