Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

बुधवार, २९ एप्रिल, २००९

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं !

Share

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं !

भरं ऊन्हात पाऊस घेवुन आभाळ मनात दाटतं !

तरी पाऊलं चालत रहातात, मनं चालत नाही !

घामाशिवाय शरिरामधे कुणीच बोलत नाही!

तितक्यात कुठुनं एक ढग सुर्यासमोर येतो ,

तितक्यात कुठुनं एक ढग सुर्यासमोर येत….

ऊन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो…

वारा ऊनाड मुलासारखा सैरावैरा पळत रहातो…..

पानाफुला, झाडांवरती छपरावरती चढुन पहातो……..

दुपार टळुन संध्याकाळचा पुन्हा सुरु होतो खेळ…

ऊन्हामागुन चालत येते, गारं गारं कातरवेळ…

चक्क डोळ्यांसमोर त्रुतु कुसं बदलुन घेतो!

पावसाआधी ढगांमधे कुठुन गारवा येतो………

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top