Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, १९ एप्रिल, २००९

आज पहाटे

Share

आज पहाटे झपाटलेला दिशाहीन मी फिरत निघालो
नदीकाठच्या बागेमधुनी जाताजाता उगाच थमलो..
अजून होता वेळ पुरेसा दिशा उजळुनी उजाडण्याला
अंधुकलेल्या वातावरणी कुंदपणाचा गुबार झाला..

दंहिवर कसले, गहिवरलेल्या आभाळाचे अश्रु ठिबकती
अन्यमनस्का हवा कोंडुनी धुम्मस पडदा सगळ्यावरती..
चुकून कुठल्या झाडावरती घरट्यामधुनी चिवचिव होई
चुकार बगळा नदीकाठचा फडफड करुनी उडून जाई..

अंधाराला चिरून गेला टिटवीचा स्वर तिखट कापरा
मासोळीचा सूर मारता चुबुकचुबुक तो सूर बावरा..
फिकट उजेडाची ये चाहुल, जरा उगवती पांढुरलेली
तरी तजेला नव्हता कसला, झाडेझुडुपे मरगळलेली..

खरेच का रे निसर्ग होता विषण्ण इतका केविलवाणा
किंवा माझ्या मनास वाटे अपुल्यासम तो उदासवाणा..?

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top