Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, २३ एप्रिल, २००९

एका वळनावर तुझी भेट

Share

एका वळनावर तुझी भेट होते,
अन संपूर्ण जीवनच बदलून जात.

तुझे आगमन जीवनात होते,
अन जणू काही वसंताची बहार होते.

जीवनातला प्रतेक दिवस आता,
नवा नवा अन हवा हवासा वाटतो.

तुझा त्या डोळ्यात खोलवर पहाताना,
मी जीवनातली दुःख विसरून जातो.

तुला भेटायला जिव आतुर होतो,
पण दूर जाताना पुन्हा भेटण्याची आस देतो.

ती भेट आज ही मी हृदयात जपून ठेवतो,
अन त्या आठवणीने मी पुन्हा स्वतःला हरवतो.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top