असं वाटतं माझा आवाज तिच्यापर्यंत पोचत नाही
आजकाल मित्रांनो, असं का होतंय कळत नाही
पण असं वाटतं माझा आवाज तिच्यापर्यंत पोचत नाही
पूर्वी असं होत नव्हतं, असं कधी वाटलं नव्हतं
बरच काही सांगायच, मनात असं साठलं नव्हतं
सांगायला जरी गेलो तर शब्दच साले आठवत नाहीत

नाही ही तक्रार नाही, तीच बिचारी खूप खूप करते
सकाळी उठल्यापासून खरंच तीच मर मर मरते
मुलं,नोकरी,स्वयंपाकपाणी कामांची यादीच संपत नाही

पण पूर्वी असं होत नव्हतं तिला माझी ओढ़ होती
एखादा सिनेमा एखादी भेळ याच्यासाठी सवड होती
मी आणलेल्या गज-याकडेही आता ती पाहात नाही

मलाही कळतंय आता आम्ही चाळिशीच्या जवळ आलोत
मुलं मोठी झालीत आता जवाबदा-यांनी गांजुन गेलोत
कळतंय मला की प्रत्येकवेळी उत्साह असू शकत नाही

असं वाटतं ठरवून फक्त दोघांसाठी वेळ काढावा
संवाद व्हावा दोघांच्यात अन स्नेहभाव थोड़ा वाढावा
प्रेम तर असतंच दोघांच्यात पण सांगितल्याशिवाय राहावत नाही
अजूनही आवडतो

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा