गजबजतो एकान्त
्तिला पाहून एकदा
झालो वेडा ्मी बेफ़ाम
गजबजला एकान्त
मनी तोडून लगाम
तिच्यासोबत सन्सार
थाटण्याचा मनसूबा
बान्धू लागलो मनात
जरी स्टॊपवरी उभा
वाटे सान्गावे जावून
तिला घेवून बाजूला
डोळ्यामधे साठवावा
तिचा चेहेरा तजेला
मग हातामधे घ्यावा
तिचा नाजूकसा हात
रन्गवावी प्रेम स्वप्ने
तिच्या प्रेम-महालात
धीर करून एकदा
गेलो गुलाब घेवून
उभी होती पाठमोरी
आज शाल लपेटून
तिच्या डोळ्यात पाहून
माझे मन केले रिते
डोळ्यामधे मात्र तिच्या
दोन थेम्ब उभे होते
तशी गेली ती निघून
एक शब्द न बोलता
आले आभाळ भरून
डोळी पाऊस दाटला
तिला जाताना पाहून
मन होई ना हे शान्त
मनी प्रश्न प्रश्न प्रश्न
पून्हा ओरडे एकान्त
मागाहून मग मला
सखी तिची समजावी
वाचा बालपणी तिची
का ही देवाघरी जावी??
आज रोज पहातो मी
तिच्या उत्तराची वाट
रोज एकला राहतॊ
गजबजतो एकान्त......
झालो वेडा ्मी बेफ़ाम
गजबजला एकान्त
मनी तोडून लगाम
तिच्यासोबत सन्सार
थाटण्याचा मनसूबा
बान्धू लागलो मनात
जरी स्टॊपवरी उभा
वाटे सान्गावे जावून
तिला घेवून बाजूला
डोळ्यामधे साठवावा
तिचा चेहेरा तजेला
मग हातामधे घ्यावा
तिचा नाजूकसा हात
रन्गवावी प्रेम स्वप्ने
तिच्या प्रेम-महालात
धीर करून एकदा
गेलो गुलाब घेवून
उभी होती पाठमोरी
आज शाल लपेटून
तिच्या डोळ्यात पाहून
माझे मन केले रिते
डोळ्यामधे मात्र तिच्या
दोन थेम्ब उभे होते
तशी गेली ती निघून
एक शब्द न बोलता
आले आभाळ भरून
डोळी पाऊस दाटला
तिला जाताना पाहून
मन होई ना हे शान्त
मनी प्रश्न प्रश्न प्रश्न
पून्हा ओरडे एकान्त
मागाहून मग मला
सखी तिची समजावी
वाचा बालपणी तिची
का ही देवाघरी जावी??
आज रोज पहातो मी
तिच्या उत्तराची वाट
रोज एकला राहतॊ
गजबजतो एकान्त......




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा