Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, १ मार्च, २००९

त्याचं-तिचं आज break-up झालंय...

Share

त्याचं-तिचं आज break-up झालंय...

काय म्हणता..?
अहो खरंच,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

तुझ्याशिवाय जगणं अन्
मरणंहि नाही,
असलं काहिसं
दोघंहि म्हणायची,,
नको-नको असतांनाही
एकमेकांना तरी बरंच झेललंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

प्रेमाचे भास असतील कदाचित सारे
गोंडस अशा या नात्यातलं
प्रेम पूर्णपणे उतू गेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

खरं प्रेम lifetime असतं,
आज आहे अन् उद्या नाही
असं त्यात कधीच नसतं,,
एकमेकांच्या विश्वासाचं
फूलपाखरू कधीच उडून गेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

तो म्हणतो ती अशीच आहे,
ती म्हणते तोही तसाच आहे,,
सारं काहि असं-तसंच असेल
तर सोबतीचा तुमचा आग्रह का आहे..?
दोघांचं मन एकमेकांसाठी
यापुर्वीच आत्महत्या करून मेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

काय वाटलं असेल कुणास ठावुक
पण मनाच्या मृत्यूनंतरच्या
अंत्यसंस्काराचं काम मात्र
दोघांनीही यथासांग केलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

ती-तिचा नवरा
तो अन् त्याची बायको
चौघांमध्येही तो मात्र तिची
उगाच अशी छेड़ काढणार,
पण गैरसमज नको हं...
कारण, त्याचं-तिचं आज नाही
ब-याच वर्षांपूर्वी break-up झालंय...

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top